बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:24 PM2019-04-16T22:24:53+5:302019-04-16T22:26:10+5:30

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

About 3 Crore 40 lakhs textbooks are registered at Bal Bharati | बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

Next
ठळक मुद्दे१ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या वर्षाकरिता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे, हे विशेष. जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटवर पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. शाळेने भरलेल्या यु-डायसनुसार वर्ग १ ते ५ ला ९९,१११ विद्यार्थी, ५ ते ८ ला ९८, ८०५ असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येणार आहे.
इयत्ता १ ते ८ मधील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना केले आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जून रोजी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे.

Web Title: About 3 Crore 40 lakhs textbooks are registered at Bal Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.