पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद
By नरेश डोंगरे | Published: September 20, 2024 11:49 PM2024-09-20T23:49:44+5:302024-09-20T23:55:11+5:30
आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे गांजा तस्करी करणारा एक अल्पवयीन आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर पकडला गेला. त्याच्या ताब्यातील पाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.
आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे. पुरी जोधपूर एक्सप्रेस आज सकाळी ११.२९ वाजता नागपूर स्थानकावर आली. फलाट क्रमांक ६ वर ती थांबली. यावेळी आरपीएफचे जावन सागर लाखे, अजय सिंह आणि जसवीर सिंह, गोवर्धन सवई तसेच रवींद्र जोशी फलाट क्रमांक ६ वर कर्तव्य बजावत होते. त्यांनी कोच नंबर एस-५ मध्ये पाहणी सुरू केली. सीटी नंबर ४९ जवळ त्यांना गांजाचा उग्र दर्प आला. त्यांनी त्या बर्थवर बसलेल्या आरोपीला विचारणा केली. खालच्या दोन बॅग तसेच जवळच्या पिट्टूची तपासणी केली असता त्यात ३३ किलो गांजा आढळला. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. प्राथमिक चाैकशीनंतर ताब्यात घेतलेला गांजा आणि आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.