नागपुरातील साठी गाठलेल्या मर्दानींची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:22 PM2018-07-23T22:22:23+5:302018-07-23T22:23:40+5:30
‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदाने जगण्याचे कसब शोधले आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी झाले असले, तरी शरीराने अजूनही त्या सृदृढ आहे. नागपूरच्या या चार मर्दानींनी नुकतीच जम्मू येथे झालेल्या नवव्या नॅशनल ओपन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदाने जगण्याचे कसब शोधले आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी झाले असले, तरी शरीराने अजूनही त्या सृदृढ आहे. नागपूरच्या या चार मर्दानींनी नुकतीच जम्मू येथे झालेल्या नवव्या नॅशनल ओपन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.
इतवारी परिसरातील लालगंज येथे राहणाऱ्या शशिकला माने वय वर्ष ६४ यांचे १२ आॅपरेशन झालेले. एका किडनीच्या आधारे त्या आयुष्य जगत आहे. धार्मिक प्रवृत्तीच्या असलेल्या शशिकला माने या मास्टर्स अॅथेलॅटिक्समध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. रनिंग, लाँग जम्प, हर्डल्स या खेळात त्यांनी आपली चपळता सिद्ध केली आहे. गेल्या ११ वर्षापासून त्या मास्टर्स अॅथेलॅटिक्सशी जुळल्या आहे. यावर्षी त्या नऊ पदाकाच्या मानकरी ठरल्या आहे. जम्मूत झाल्याने नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी लाँग जम्प, १०० व २०० मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. बजाजनगरातील व्हीएनआयटीच्या मैदानावर दररोज सकाळी धावणाºया मोहिनी देशपांडे यासुद्धा ६९ वर्षाच्या आहे. मात्र शरीराने अगदी फिट आहे. आजच्या तरुणींना लाजवेल एवढी चपळता त्यांच्यात आहे. मास्टर्स अॅथेलॅटिक्सच्या त्यासुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांनीही ६५ वर्ष वयोगटात १०० व २०० मीटर रनिंगमध्ये सुवर्ण पदक पटकाविले आहे.