मनपा सभेला सरासरी १५ नगरसेवकांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:42 PM2018-04-10T22:42:30+5:302018-04-10T22:42:54+5:30

नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत विविध भत्ते व मानधनापोटी नगरसेवकांना अडीच कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

The absence of average 15 corporators in the NMC meeting | मनपा सभेला सरासरी १५ नगरसेवकांची अनुपस्थिती

मनपा सभेला सरासरी १५ नगरसेवकांची अनुपस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देमानधनाचा आकडा अडीच कोटींहून अधिक : वर्षभरातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत विविध भत्ते व मानधनापोटी नगरसेवकांना अडीच कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. मनपामध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकानंतर एकूण किती सभा झाल्या, यात प्रत्येक सभेला किती नगरसेवक अनुपस्थित होते, नगरसेवकांना भत्ते व मानधन म्हणून किती रक्कम देण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मनपाच्या एकूण १८ सभा झाल्या. यात एकूण २७५ नगरसेवक अनुपस्थित होते. याची सरासरी ही प्रति सभा १५ इतकी येत आहे.
वर्षभराच्या कालावधीत नगरसेवकांना विविध भत्ते व मानधनापोटी २ कोटी ६५ लाख ९ हजार ७५६ रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली. जुलै २०१७ पासून शासन निर्णयानुसार नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात आले आहे, हे विशेष.

जनतेच्या प्रश्नांपेक्षा नववर्ष स्वागत अधिक महत्त्वाचे
मनपातर्फे ३० डिसेंबर २०१७ रोजीदेखील सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या काळात नववर्षाचे स्वागतात अनेक जण व्यस्त असतात. बहुदा नगरसेवकदेखील यात व्यस्त असावेत. म्हणूनच की काय थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३१ नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते. तर २७ मार्च २०१८ रोजी झालेल्या सभेला २९ नगरसेवक अनुपस्थित होते.

Web Title: The absence of average 15 corporators in the NMC meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.