नागपूर जिल्ह्यातील पेंचमध्ये मुबलक जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:58 PM2018-03-21T23:58:38+5:302018-03-21T23:58:50+5:30
उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. शहराला महिन्याकाठी १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा लागतो. आतापर्यंत पेंच धरणामध्ये संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महाव्यवस्थापक दिलीप टिपणीस यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. शहराला महिन्याकाठी १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा लागतो. आतापर्यंत पेंच धरणामध्ये संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महाव्यवस्थापक दिलीप टिपणीस यांनी दिली. याव्यतिरिक्त तेथील कर्मचाऱ्यांच्या व अधिका ऱ्यांच्या समस्या सभापती पिंटू झलके यांनी जाणून घेतल्या. धरणातील सहा मशीन्स कार्यान्वित असून तेथे विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्याची सूचना सभापती पिंटू झलके यांनी केली. पेंच धरणातील जलसाठा, पंप हाऊस याची पाहणी मान्यवरांनी केली.