बँकेच्या अ‍ॅपचा गैरवापर

By admin | Published: May 12, 2017 02:56 AM2017-05-12T02:56:34+5:302017-05-12T02:56:34+5:30

बँकेच्या यूपीआय अ‍ॅपचा गैरवापर करून काही ठगबाजांनी राज्यातील १२ शहरातील विविध बँकांना कोट्यवधी रुपयांनी

Abuse of the bank's app | बँकेच्या अ‍ॅपचा गैरवापर

बँकेच्या अ‍ॅपचा गैरवापर

Next

लाखोंची रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात : बँकिंग वर्तुळात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेच्या यूपीआय अ‍ॅपचा गैरवापर करून काही ठगबाजांनी राज्यातील १२ शहरातील विविध बँकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नागपुरातील लकडगंजमध्येही अशा प्रकारची एक घटना घडली असून, या प्रकारामुळे बँकिंग वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बँक खात्याशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल आणि ई-मेल आयडीचा वापर करून बँकेचा यूपीआय अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतो. त्याद्वारे आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करणे, तेथून दुसऱ्या खात्यात वळती करणे, असे व्यवहार करता येतात. बँक खातेधारकाच्या मागणीनुसार, बँकेची आॅनलाईन प्रणाली हे व्यवहार पार पाडते. त्याचा काही ठगबाजांनी पद्धतशीर दुरुपयोग करून घेतला आहे. आपल्या खात्यात एक रुपया नसताना आॅनलाईन बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून काही जण परस्पर लाखो रुपये दुसऱ्या खात्यात वळते करतात. नंतर ही रक्कम काढून घेतली जाते.
अशा प्रकारचे अनेक गुन्हे राज्यभरात झाले असून, बँकेला अनेक ठगबाजांनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे. नागपुरातील लकडगंज भागात असलेल्या बँक आॅफ महाराष्टच्या वर्धमाननगर शाखेतही १५ ते १८ जानेवारी २०१७ दरम्यान दोन वेळा असे गैरव्यवहार झाले. आरोपी दीपक अशोक डुंबरे(रा. महेश नगर, वाठोडा रिंग रोड, नंदनवन) याने त्याच्या बँक खात्यात ६०२७०३६१२११ कोणतीही शिल्लक नसताना त्याच्या खात्यामधून त्याने ५०१००००९७६१८९१ आणि १४३४०००१०८१९६९३१ या खात्यांमध्ये दोनदा प्रत्येकी एक लाख (एकूण दोन लाख) रुपये वळते केले.
तब्बल पाच महिन्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँक व्यवस्थापक आर. सेलूप्रताप होओ (रा. जुना सुभेदार लेआऊट हुडकेश्वर) यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. थोरात यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचे कलम ४१९, ४२० भादंवि, तसेच सहकलम ६६ (सी) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी डुंबरेचा शोध घेतला जात आहे.

आॅनलाईनचा फटका
नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यवहार करण्याची स्पर्धा सुरू झाली. बँकांनीही आपल्या खातेधारकांना आॅनलाईन व्यवहारासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विविध अ‍ॅपही उपलब्ध झाले. सर्वसामान्य नागरिकांना या प्रणालीचा किती फायदा झाला, हा विषय वादाचा ठरू शकतो. मात्र, ठगबाजांनी त्याचा लगोलग अ‍ॅपचा गैरफायदा घेतला. लकडगंजसारखेच पुणे, मुंबई, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे करून सुमारे २५ कोटी रुपयांनी गंडा घातल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Abuse of the bank's app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.