नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 10:22 PM2022-08-24T22:22:53+5:302022-08-24T22:23:25+5:30
Nagpur News नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला स्कूल व्हॅन चालक मित्राने धमकावून तिच्यावर अत्याचार केला.
नागपूर : नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला स्कूल व्हॅन चालक मित्राने धमकावून तिच्यावर अत्याचार केला. बेलतरोडी येथील बेसा ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. उमेश राऊत (वय २६, रा. झेंडा चौक, रामटेक) असे आरोपीचे नाव आहे. तो स्कूल व्हॅन चालवितो. पीडित १७ वर्षीय विद्यार्थिनीही नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलच रहिवासी आहे.
दोघांचीही जुनी ओळख आहे. उमेशच्या व्हॅनमध्ये येत-जात असताना दोघांची ओळख झाली. ७ जुलैला ती नीट परीक्षेसाठी नागपुरात आला होता. उमेशही नागपुरात आला. त्याने विद्यार्थिनीला बेसा ग्रामपंचायतीच्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. विद्यार्थिनीने कुटुंबीयांना अनेक दिवसांनी या घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी रामटेक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रामटेक पोलिसांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी अत्याचार, पोक्सो आणि धमकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उमेशला अटक केली आहे.