नागपूर विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदार संघावर अभाविपचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:47 PM2023-03-23T12:47:30+5:302023-03-23T12:48:37+5:30

महाविकास आघाडीला धक्का : पाचही राखीव जागांवर अभाविप विजयी, खुल्या प्रवर्गातही तीन उमेदवार आघाडीवर

ABVP won Senate graduate constituency election of RTM Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदार संघावर अभाविपचा झेंडा

नागपूर विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदार संघावर अभाविपचा झेंडा

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदार संघावर यंदाही अभाविपनेच झेंडा फडकवला आहे. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अभाविपने महाविकास आघाडीला धक्का देत आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर विजय प्राप्त केला. तर खुल्या वर्गामध्येसुद्धा अभाविपचे वंजारी, चव्हाण, चांगदे या तीन उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू आहे. मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नागपूर विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर अधिसभा मतदार संघामध्ये ६० हजार मतदारांमधून केवळ १३ हजार ८०० मतदारांनी (२३ टक्के) आपला हक्क बजावला आहे. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राखीव जागांवर ‘अभाविप’चे उमेदवार प्रथमेश फुलेकर (अनुसूचित जाती), दिनेश शेराम (अनुसूचित जमाती), सुनील फुडके (इतर मागासवर्ग ओबीसी), वामन तुर्के (भटके व विमुक्त जमाती) आणि रोशनी खेलकर (महिला प्रवर्ग) यांनी विजय मिळवला. राखीव वर्गाचे निकाल बुधवारी पहाटे ४ वाजता जाहीर झाले तर खुल्या प्रवर्गातील २५ उमेदवारांसाठीचे मतदान बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. निर्णायक कोटा २०४३ मतांचा होता. परंतु, एकाही उमेदवाराने हा कोटा पूर्ण केला नाही. १३ व्या राऊंडमध्ये अभाविपचे मनीष वंजारी, विष्णू चांगदे, अजय चव्हाण हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. तर युवा ग्रॅज्युएट फोरमचे राहुल हनवते हे चौथ्या व महाविकास आघाडीचे मनमोहन वाजपेयी हे पाचव्या क्रमांकावर होते. अभाविपचे वसंत चुटे सहाव्या, सिनेट परिवर्तन पॅनलचे आशिष फुलझेले सातव्या, महाविकास आघाडीचे प्रवीण उदापुरे आठव्या क्रमांकावर होते.

राखीव प्रवर्गातील निकाल

  • प्रथमेश फुलेकर - अनुसूचित जाती - ५६८७ - अभाविप
  • दिनेश शेराम - अनुसूचित जमाती - ५०४१ अभाविप
  • सुनील फुडके - ओबीसी - ४७६० - अभाविप
  • वामन तुर्के - भटके विमुक्त - ४८०८ - अभाविप
  • रोशनी खेळकर - महिला - ५१३८ - अभाविप

Web Title: ABVP won Senate graduate constituency election of RTM Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.