एसीबीच्या अधिका-यांनी घेतली भ्रष्टचार निर्मुलनाची शपथ
By admin | Published: October 31, 2016 03:45 PM2016-10-31T15:45:34+5:302016-10-31T15:45:34+5:30
नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनजागृती सप्ताहाची सुरूवात केली. विदर्भातील एसीबीच्या सर्व कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांनी भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी जनजागृती सप्ताहाची सुरूवात केली. विदर्भातील एसीबीच्या सर्व कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांनी भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात केली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2016या कालावधीत एसीबीतर्फे भ्रष्टाचाराविरोधी दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे.
या सप्ताहमध्ये नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्हा कार्यालयांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचारामुळे होणा-या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा, पथनाट्य आणि कार्यशाळा पार पडणार आहेत. पत्रके, बॅनर, होर्डिंगच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे. लाच देणे किंवा घेणे दोन्ही कायद्यानुसार गुन्हा आहे.
भ्रष्टाचार निर्मुलनाकरीता केवळ सरकारी यंत्रणा कार्यरत असून चालणार नाही तर ही कीड संपवण्यासाठी जनतेच्या सहभागाचीही आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्याची गरज एसीबीच्या अधिका-यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.
तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवणार
कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये काम करून देण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कुणी दलाल (खाजगी व्यक्ती) लाच देण्याची मागणी करत असेल, तर एसीबीच्या कार्यालयात तातडीने संपर्क करावा, असे आवाहन एसीबीचे उपायुक्त संजय दराडे यांनी केले आहे.
भ्रष्टाचाराची तक्रार करून लाचखोरांना कोठडीत डांबण्यास मदत करणा-या तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले आहे. नागरिक आपली तक्रार 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा एसीबीच्या संकेतस्थळ आणि फेसबुक पेजवरही करू शकतात.