पारडी उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘विशेष सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:14 PM2019-05-20T23:14:59+5:302019-05-20T23:16:04+5:30

पारडी उड्डाणपुलाच्या कासवगतीने होणाऱ्या कामामुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला. तसेच कामाच्या संथगतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. पुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘विशेष सेल’गठित करण्याचा निर्णय सोमवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

To accelerate the work of Paradi flyover, special cell | पारडी उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘विशेष सेल’

पारडी उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘विशेष सेल’

Next
ठळक मुद्देप्रशासन लागले कामाला : दोन बहिणींचे बळी गेल्यानंतर आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या कासवगतीने होणाऱ्या कामामुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला. तसेच कामाच्या संथगतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. पुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘विशेष सेल’गठित करण्याचा निर्णय सोमवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
यावेळी आयुक्त अभिजित बांगर, आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक प्रवीण दटके, बाल्या बोरकर, दीपक वाडीभस्मे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक संचालक (नगर रचना) प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, अमीन अख्तर, सहायक आयुक्त विजय हुमणे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, हरीश राऊत, मनोज अग्रवाल यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
हॉटेल गोमती ते पारडी जकात नाक ा या मुख्य मार्गावर भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने काम संथ असल्याचे सांगितले जात होते. मुळात हॉटेल गोमती ते पारडी नाका या मार्गावर भूसंपादनाचा विषयच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या मार्गावरील कामाला प्रथम प्राधान्य देत उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पारडी पुलासह शहरातील केळीबाग व भंडारा रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी, यासाठी विशेष सेल गठित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. विशेष सेलचे नेतृत्व महेश धामेचा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भूसंपादन करावयाच्या असलेल्या मार्गावरील भागातील जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने भूसंपादनबाधित नागरिकांशी संपर्क साधून दररोज रजिस्ट्री करण्याचेही निर्देश दिले. या कामाबाबत कोणताही बेजाबदारपणा, कामचुकारपणा होऊ नये यासाठी आयुक्त सभागृहात दररोज सकाळी १० वाजता अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी एकमेकांशी समन्वय साधून कामाचा अहवाल सादर करतील.
पारडी मार्गावर दररोज अतिक्रमण कारवाई
पारडी येथील उड्डाण पुलाचे काम आणि अतिक्रमण यामुळे येथील मुख्य मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत या भागात दररोज अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून पोकलेन व टिप्पर देण्यात येईल. तर पोलीस बंदोबस्तात मनपाचे अधिकारी अतिक्रमण कारवाई करतील.

Web Title: To accelerate the work of Paradi flyover, special cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.