काळानुरूप बदल समाजाने स्वीकारावा

By admin | Published: December 28, 2015 03:31 AM2015-12-28T03:31:55+5:302015-12-28T03:31:55+5:30

वेळेनुसार होणारा बदल हा सतत प्रक्रियेचा भाग आहे. बदलत्या वेळेसोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात विकास साध्य केला जाऊ शकतो.

Accept the change in times by the society | काळानुरूप बदल समाजाने स्वीकारावा

काळानुरूप बदल समाजाने स्वीकारावा

Next

लोधी समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन थाटात
नागपूर : वेळेनुसार होणारा बदल हा सतत प्रक्रियेचा भाग आहे. बदलत्या वेळेसोबत चालल्यास प्रत्येक क्षेत्रात विकास साध्य केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवैभवात रममाण राहण्यापेक्षा लोधी समाजाने होणारा बदल स्वीकारून विकास साधावा, असे आवाहन मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी यांनी केले. लोधी समाजाच्या युवक-युवती परिचय संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.
लोधी क्षत्रिय संस्थेच्यावतीने समाजातील उपवर युवक-युवतींचे परिचय संमेलन आयोजित करण्यात आले. शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित या संमेलनात बाडनेर, राजस्थान येथील बाल साध्वी नंदिनी देवी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, गोंदियाच्या माजी जिप. अध्यक्ष रजनी नागपुरे, भोपाळचे माजी जिल्हाधिकारी अमरसिंह चंदेल, नंदलाल लोधा, संजय करमरकर, जिप सदस्य नाना कंभाले, आदी मान्यवर उपस्थित होते. दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, या काळात योग्य पालक म्हणून सिद्ध होण्यासाठी मुलांसोबत पालकांनीही शिक्षित होणे गरजेचे आहे. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील जवळपास ५०० युवक-युवतींनी आपला परिचय दिला.सोबतच गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कंचन करमरकर व कविता ठाकरे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कान्होले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

साक्षी महाराज पोहचले नाहीत
संमेलनासाठी मुख्य वक्ता म्हणून भाजप खासदार साक्षी महाराज यांना बोलाविण्यात आले होते. मात्र ते आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे कुणीतरी साक्षी महाराज यांना धार्मिक वक्तव्यावरून धमकी दिली होती. त्यांनी या प्रकरणी उन्नाव पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केली आहे. येथील व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमाला येऊ न शकल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Accept the change in times by the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.