भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:22 AM2018-12-04T01:22:05+5:302018-12-04T01:23:06+5:30

चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत आॅफ लाईन दावे स्वीकारणे बंद होणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे प्रादेशिक आयुक्त विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Accepting Provident Fund claims online | भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

Next
ठळक मुद्देविकास कुमार यांची माहिती : पैसा अन् वेळेची होईल बचत

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत आॅफ लाईन दावे स्वीकारणे बंद होणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे प्रादेशिक आयुक्त विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विकास कुमार म्हणाले, आॅनलाईन दावे स्वीकारल्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निधी कार्यालयात यावे लागणार नाही. त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल. याशिवाय यापूर्वी दावा केल्यानंतर खात्यात रक्कम जमा होण्यासाठी २० दिवस लागत होते. आता ही प्रक्रिया केवळ सात दिवसात पूर्ण होऊन खात्यात पैसे जमा होतील. आधुनिक युगात प्रत्येक ठिकाणी संगणकाची सुविधा आहे. त्यामुळे कर्मचारी आपला दावा सहजरीत्या आॅनलाईन करू शकतात. पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेनुसार १ एप्रिल २०१६ नंतर नवी नोकरी देणाऱ्या कंपनीला कर्मचाऱ्यांचे ईपीएफचे पैसे भरण्याची गरज नसून हे पैसे तीन वर्षापर्यंत केंद्र शासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भविष्य निधी कार्यालयाच्या अंतर्गत १ लाख १६ हजार निवृत्ती वेतनधारक आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. कार्यालयाद्वारे आतापर्यंत ६० हजार जणांचे जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी पूर्वी कर्मचाऱ्यांना या कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता हे काम बँकेद्वारे होत असून बँकेला त्यासाठी कमिशन देण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी या बँकेत अपडेट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Accepting Provident Fund claims online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.