जिल्ह्यात अपघातवार

By Admin | Published: February 21, 2017 02:14 AM2017-02-21T02:14:56+5:302017-02-21T02:14:56+5:30

जिल्ह्यातील कन्हान, देवलापार, उमरेड, कळमेश्वर व हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या.

Accident in the district | जिल्ह्यात अपघातवार

जिल्ह्यात अपघातवार

googlenewsNext

चौघांचा मृत्यू : वेगवेगळ्या पाच घटनांमध्ये ११ जण जखमी
नागपूर : जिल्ह्यातील कन्हान, देवलापार, उमरेड, कळमेश्वर व हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ११ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा वर्षीय बालकासह एका तरुणाचा व कामगाराचा समावेश आहे. या घटना कन्हान शहर, वडांबा शिवार, कळमेश्वर बायपास रोड व उदासा - ठोंबरा मार्गावर घडल्या. कन्हान येथील जखमींना कामठी येथे तर उर्वरित दोन अपघातातील जखमींना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.
कन्हान : लग्न समारंभ आटोपून परत जाण्यासाठी उभ्या असलेल्या सहा जणांना भरधाव मोटरसायकलने धडक दिली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन बालकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित पाच जणांसह मोटरसायकल चालक हा गंभीर जखमी झाला. त्यांना लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. हा अपघात कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयदुर्गा मंगल कार्यालयासमोर रविवारी (दि. १९) रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास झाला.
प्रिन्स राजेश यादव (६, रा. यादव नगर, कामठी) असे मृत बालकाचे नाव असून जखमींमध्ये अभिषेक महेश यादव (२३), महेश माधवलाल यादव (५१), शानसिंह सत्यनारायण यादव (५४), रूपलाल यादव (६२), प्रीतम विजय यादव (१२) सर्व रा. यादवनगर कामठी यांच्यासह मोटरसायकल चालक संजय मेहुणे रा. विवेकानंदनगर कन्हान यांचा समावेश आहे.
कन्हान नगर परिषद कर्मचारी रामू यादव यांच्याकडील लग्न सोहळा राष्ट्रीय महामार्गावरील जयदुर्गा मंगल कार्यालयात होता. या लग्न समारंभात सहभागी होऊन लग्न आटोपल्यानंतर ते कामठी येथे जाण्याच्या तयारीत होते. मंगल कार्यालयासमोर ते आपल्या वाहनाजवळ उभे असताना एमएच-३१/डीपी-६७११ क्रमांकाच्या भरधाव मोटरसायकलने धडक दिली. त्यात प्रिन्स आणि इतर पाच जण तसेच मोटरसायकल चालक जखमी झाला. त्यांना लगेच कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे प्रिन्सला मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी कन्हान पोलिसांनी मोटरसायकल चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पोटे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Accident in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.