नागपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात; पाच ठार १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:24 PM2018-10-10T12:24:45+5:302018-10-10T12:25:38+5:30

नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर मागून धडकली.

Accident on Nagpur-Gadchiroli highway; Five killed, 19 injured | नागपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात; पाच ठार १९ जखमी

नागपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात; पाच ठार १९ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देबंद असलेल्या ट्रकवर आदळली ट्रॅव्हल्स

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर मागून धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह एका महिलेचा समावेश आहे. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. हे सर्व जण नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे जाणाऱ्या एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाचा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. दुसरीकडे, उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व सर्व जखमींला लगेच उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Accident on Nagpur-Gadchiroli highway; Five killed, 19 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात