दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:56+5:302020-12-16T04:26:56+5:30

नरखेड : उखडलेल्या रस्त्यामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अशात दुचाकी उसळून पुलाच्या पिल्लरवर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा ...

Accidental death of a cyclist | दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Next

नरखेड : उखडलेल्या रस्त्यामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अशात दुचाकी उसळून पुलाच्या पिल्लरवर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सावनेर-मालापूर मार्गावर साेमवारी (दि.१४) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

शशिकांत विठ्ठलराव केने (४५, रा. सावरगाव, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. मृत शशिकांत केने हा आपल्या एमएच-३१/एजी-५५५६ क्रमांकाच्या दुचाकीने बाबा मेश्राम याच्यासह सावरगाव ते मालापूर रस्त्याने जात हाेता. दरम्यान उखडलेल्या रस्त्यावरून त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी उसळून पुलाच्या पिल्लरवर आदळली. त्यात शशिकांतच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. लागलीच त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक खुटेमाटे करीत आहेत.

Web Title: Accidental death of a cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.