बालिकेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:04+5:302021-03-01T04:09:04+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : वेगात असलेल्या मॅक्सचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि मॅक्स विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर ...

Accidental death of a girl | बालिकेचा अपघाती मृत्यू

बालिकेचा अपघाती मृत्यू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : वेगात असलेल्या मॅक्सचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि मॅक्स विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या मॅक्समधील आठ वर्षीय बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव शिवारात शनिवारी (दि. २७) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.

गुलनाज शाह (८, रा. सरळपार, ता. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर) असे मृत बालिकेचे नाव आहे. गुलनाज ही तिचे वडील परवेझ मुस्तकीन शाह (४०, रा. सरळपार, ता. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर) यांच्यासाेबत एमएच-३०/एल-४००७ क्रमांकाच्या मॅक्सने नागभीड (जिल्हा चंद्रपूर) येथून नागपूरला जात हाेती. मॅक्समध्ये तिचे कुटुंबीयही हाेते.

दरम्यान, पाचगाव शिवारात अचानक टायर फुटल्याने चालकाचा मॅक्सवरील ताबा सुटला. त्यामुळे ही मॅक्स विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर क्राॅसमध्ये धडकली. यात मॅक्सचा लाेखंडी अँगल तुटून गुलनाजच्या डाेक्याला जाेरात लागल्याने ती गंभीर जखमी झाली, शिवाय मॅक्स राेडलगतच्या नालीत शिरल्याने मॅक्समधील इतर प्रवासीही जखमी झाले. मात्र, काही वेळात गुलनाजचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्व जखमींना उपचारासाठी तर गुलनाजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी कुही पाेलिसांनी परवेझ शाह यांच्या तक्रारीवरून भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक देरकर करीत आहेत.

Web Title: Accidental death of a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.