घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:19 PM2019-08-29T20:19:45+5:302019-08-29T20:20:55+5:30

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली.

Accidental death of housework woman | घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू

घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू

Next
ठळक मुद्देकाम करता करताच तिने घेतला शेवटचा श्वास : नागपूरच्या वर्धमाननगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला. विमलबाई प्रभाकर पोपाटे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली.
विमलबाई कळमन्यातील डिप्टी सिग्नल भागात राहत होत्या. त्या वर्धमाननगरातील पशू खाद्य विकणारे निरंजन सुभाष काळे यांच्याकडे चार वर्षांपासून घरकाम करायच्या. काळे हे एकटेच घरी राहतात. विमलबाई त्यांची विश्वासपात्र होती. त्यामुळे काळेच्या घराच्या खालच्या रूमची चावी त्यांच्याकडे राहायची. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बरे वाटत नव्हते. त्यांनी तसे घरच्यांना, सोबत काम करणाऱ्या महिलेला आणि काळे यांनाही सांगितले होते. मात्र, गरिबीमुळे विमलबाईला रोज कामावर जावे लागत होते. बुधवारी दुपारी एका महिलेसह विमलबाई काळेच्या घरी कामाला आल्या. सोबतच्या महिलेने तिचे काम केले आणि ती निघून गेली. विमलबाई खाली साफसफाई करत असताना वरच्या माळ्यावर राहणाऱ्या काळेंनी त्यांना दुपारी १२ च्या सुमारास आंघोळीसाठी पाणी गरम करण्यास सांगितले. दुपारी १ च्या दरम्यान काळे खाली आले असता विमलबाई निपचित पडून दिसल्या. काळेंनी त्यांना आवाज देऊन उठविण्याचे प्रयत्न केले. हालचाल करीत नसल्याचे बघून आजूबाजूच्यांना गोळा केले. लकडगंज पोलिसांनाही माहिती दिली. एएसआय उपाध्याय आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तोवर विमलबाईंचा मृत्यू झाला होता. काळेंनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विमलबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Accidental death of housework woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.