अनाेळखी तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:49+5:302021-07-27T04:08:49+5:30
कुही : अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही-उमरेड ...
कुही : अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही-उमरेड मार्गावरील उटी गावाजवळ शनिवारी (दि. २४) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
मृताचे वय ३० वर्षांच्या आसपास आहे. उटी येथील बसस्टाॅपजवळ तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि त्याला उपचारार्थ नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तेथे उपचाराला सुरुवात करताच त्याचा मृत्यू झाला. हा तरुण बसस्टाॅपजवळ राेडच्या कडेला उभा असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात ताे गंभीर जखमी झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. त्याची उंची १६० सेंमी असून, वर्ण निमगाेरा, चेहरा लांबट, बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या हातावर अक्षय एआर असे गाेंदले असून, त्याने पांढरा टी-शर्ट व ग्रे नाईट पॅन्ट परिधान केली हाेती. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.