तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:45+5:302021-08-20T04:11:45+5:30

बुटीबाेरी : भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या ...

Accidental death of a young man | तरुणाचा अपघाती मृत्यू

तरुणाचा अपघाती मृत्यू

Next

बुटीबाेरी : भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरी येथे ११ ऑगस्टला घडली.

नीतेश मुरलीधर ठाकरे (२९, रा. साेनेगाव बाेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नीतेश हा आपल्या एमएच-४०/बीआर-४८१८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना खैरी गावाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने त्याच्या डाेक्याला दुखापत झाली. लगेच त्याला प्रथम बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटल व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान शनिवारी (दि.१४) त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संताेष ठाकूरदास दधहरे (३२, रा. गिट्टीखदान, प्लाॅट क्र. १२१, प्रशांत काॅलनी, गाेरेवाडा राेड, नागपूर) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक भारती करीत आहेत.

Web Title: Accidental death of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.