रांचीला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:55 PM2019-06-27T20:55:56+5:302019-06-27T20:56:49+5:30
वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते.
गो एअरच्या जी-८ २५०३ रांची-मुंबई विमानात आदर्श झा (२१) हा युवक वडील मनोज झा आणि कुटुंबाच्या अन्य सदस्यांसह मुंबईत जात होता. विमान रांची विमानतळावरून उडाल्यानंतर अर्धा तासातच आदर्शच्या छातीत दुखणे वाढले. याची सूचना विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला दिली. त्यांनी सकाळी ९.४० वाजता नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. त्यानंतर विमान सकाळी ९.४५ वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. या दरम्यान एमआयएलच्या टर्मिनलच्या माध्यमातून त्वरित अॅम्ब्युलन्स मागविण्यात आली. युवकाला रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर त्याला त्वरित विमानतळावर आणून विमानात बसविण्यात आले. त्यानंतर विमानाने सकाळी १०.१५ वाजता मुंबईकडे उड्डाण भरले.