अपघातमुक्त शिलेदारांचा सत्कार

By admin | Published: February 7, 2017 02:10 AM2017-02-07T02:10:18+5:302017-02-07T02:10:18+5:30

जीवन सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने शहराला अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिलेदारांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

Accidents | अपघातमुक्त शिलेदारांचा सत्कार

अपघातमुक्त शिलेदारांचा सत्कार

Next

नागपूर : जीवन सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने शहराला अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिलेदारांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, नलिनी देऊळगावकर, डॉ. प्रदीप येळणे, राजू वाघ, बबनराव वानखेडे व बाळासाहेब काटे उपस्थित होते. बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळेच होतात. हे टाळण्यासारखे आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातमुक्त नागपूर अभियानात मोलाचे व विशेष उल्लेखनीय कार्यासाठी यावर्षी ‘पर्सिस्टंट फाऊंडेशन’, ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी’, ‘कळमेश्वर शाखा, जीवन सुरक्षा प्रकल्प’ व ‘एनआयटी पॉलिटेक्निक’ काटोल रोड यांना हा पुरस्कार देण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.