सोमठाणा घाटात अपघात; १ ठार, ६ जखमी

By admin | Published: January 20, 2017 02:03 AM2017-01-20T02:03:32+5:302017-01-20T02:03:32+5:30

दारव्हाकडे जाणारी कार उलटली.

Accidents in Somatha Ghat; 1 killed, 6 injured | सोमठाणा घाटात अपघात; १ ठार, ६ जखमी

सोमठाणा घाटात अपघात; १ ठार, ६ जखमी

Next

वाशिम, दि. १९- कारंजा येथून दारव्हाकडे जाणारी इंडिका कार उलटून १ जण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान सोमठाणा घाटात घडली.
कारंजा येथील रहिवासी मनोहर वानखडे, दिलीप पाटील आणि आणखी चार जण इंडिका कारने कारंजा येथून दारव्हा जवळील धामणाव देव येथे मुंगसाजी महाराज मंदिरात दर्शनाकरिता जात होते. गुरुवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान वेगात असलेली गाडी सोमठाणाजवळ उलटली. या अपघातात मनोहर वानखडे हे ठार झाले तर दिलीप पाटील हे गंभीर जखमी आहेत. इतर ५ जन देखील जखमी असून त्यांना अमरावती येथे उपचारार्थ अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Accidents in Somatha Ghat; 1 killed, 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.