खात्यात फेरफार, मॅनेजरकडून कंपनीच्या ११.२३ लाखांचा अपहार
By दयानंद पाईकराव | Published: April 6, 2024 08:32 PM2024-04-06T20:32:58+5:302024-04-06T20:33:03+5:30
आरोपी खरडे याने कंपनीच्या खात्यात पैसे जमा न करता खात्यात फेरफार करून परस्पर रक्कम वापरल्याचे उघड झाले
नागपूर : कंपनीचे ११ लाख २३ हजार ९९८ रुपये रोख स्वरुपात स्वीकारून व कंपनीच्या खात्यात फेरफार करून मॅनेजरने कंपनीला गंडा घातला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद जनार्धन खरडे (५१, रा. वसंत विहार सोसायटी, दत्तवाडी) असे आरोपी मॅनेजरचे नाव आहे. ते वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट नं. ५०, वर्मा ले आऊट, खडगाव रोड वाडी येथील एनआयटीओ लॉजिस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत होते. त्यांनी ४ मे २०२१ ते ९ जून २०२३ दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीला येणे असलेली रक्कम संबंधीत पार्टीकडून रोख स्वरुपात घेतली. त्यानंतर त्या रक्कमेचा आपल्या फायद्यासाठी वापर केला.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाडी शाखेचे ऑडीट केले. त्यात आरोपी खरडे याने कंपनीच्या खात्यात पैसे जमा न करता खात्यात फेरफार करून परस्पर रक्कम वापरल्याचे उघड झाले. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी मनोहर नागदेवराव सावंत (५१, रा. दत्तवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी खरडेविरुद्ध कलम ४२०, ४०८ नुसार गु न्हा दाखल करून तपास सुरु केला आ