नागपुरात हरिणाच्या  कातड्यासह आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:54 AM2018-01-05T00:54:12+5:302018-01-05T00:56:26+5:30

जरीपटका पोलिसांनी नारा घाटाजवळ एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हरिणाचे कातडे जप्त केले.

The accused arrested along with the skin of the hare in Nagpur | नागपुरात हरिणाच्या  कातड्यासह आरोपीला अटक

नागपुरात हरिणाच्या  कातड्यासह आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देजरीपटका पोलिसांची कामगिरी : आरोपी वनविभागाच्या स्वाधीन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : जरीपटका पोलिसांनी नारा घाटाजवळ एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हरिणाचे कातडे जप्त केले. अमन देवेंद्र जनबंधू (वय २५, रा. वेदनगर, नारा रोड) असे आरोपीचे नाव आहे.
जरीपटक्याचे पोलीस पथक गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास गस्त करीत असताना आरोपी अमन नारा मार्गावर त्यांना दिसला. वाहनातील पोलिसांसोबत नजरानजर होताच त्याच्या हालचाली संशयास्पद झाल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेल्या पिशवीची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात त्यांना हरिणाचे कातडे दिसले. पोलिसांनी ते जप्त केले. हे कातडे कुठून आणले कुणाकडे नेत होता, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. घरगुती वापरासाठी महिनाभरापूर्वी आपण ते विकत घेतले होते, असे तो म्हणाला. पोलिसांनी त्याला ठाण्यात आणून बराच वेळ त्याची चौकशी केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कळमना ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. जरीपटक्याचे ठाणेदार यू. डी. मुळक, उपनिरीक्षक संजय चप्पे, हवालदार गजेंद्र ठाकूर, बंडू कळंबे, नायक गणेश बरडे, रोशन तिवारी, विशाल नागभिडे, रवींद्र भंगाळे यांनी बजावली.
आरोपी वनविभागाच्या हवाली
हे प्रकरण वनविभागाशी संबंधित असल्यामुळे पोलिसांनी लष्करीबागेचे वन क्षेत्र सहायक रमेश आदमने यांना माहिती देऊन बोलवून घेतले.पंचनाम्याची औपचारिकता पूर्ण करून पोलिसांनी आरोपी अमनला वनविभागाच्या हवाली केले. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करणार आहेत.

Web Title: The accused arrested along with the skin of the hare in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.