सौदीत पळून जाऊ पाहणा-या आरोपीस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:17 PM2018-03-29T22:17:34+5:302018-03-29T22:18:05+5:30

The accused arrested the witness and fled | सौदीत पळून जाऊ पाहणा-या आरोपीस पकडले

सौदीत पळून जाऊ पाहणा-या आरोपीस पकडले

Next
ठळक मुद्देविमानतळावरून अटक : हॉटेल पेटविल्याचे प्रकरण : सीताबर्डी पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉ कॉलेज चौकात सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या एका बहुमजली ईमारतीतील हॉटेल पेटवून देणा-या चार पैकी एका आरोपीच्या सीताबर्डी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तो सौदी अरेबियात पळून जाण्याच्या तयारीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईमुळे बुधवारी रात्री विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.
रोशन कयुम गणी शेख (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो टीएमटी कॉलनी, गिट्टीखदानमधील रहिवासी आहे. १२ मार्चला पहाटेच्या सुमारास लॉ कॉलेज चौकातील एका ईमारतीत अर्जूनसिंह छाबरा आणि पवन सुभाष निरभात यांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी चालवली होती. त्यासाठी फर्निचर आणि इंटेरियर डेकोरेशनचे काम
सुरू होते. १२ मार्चला पहाटेच्या सुमारास या हॉटेलला भीषण आग लागली. आगीत फर्निचरसह अन्य साहित्याचीही राखरांगोळी झाली. आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाच्या १४ बंबांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर आग विझविण्यात यश मिळाले होते. ही आग लागली नाही तर प्रतिस्पर्धी व्यवसायिकाने लाग लावल्याचा संशय छाबराने तक्रारीतून व्यक्त केला होता. दरम्यान, आग लावण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यात चार आरोपीही दिसत होते. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. सीसीटीव्हीत दिसणारांपैकी रोशन कयूम गणी शेखला फिर्यादीने ओळखले. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो विमानाने सौदी अरेबियाला पळून जात असल्याची माहिती बुधवारी रात्री ठाणेदार हेमंत खराबे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सहका-यांसह तिकडे धाव घेतली. त्यानंतर रोशनला रात्री ९.५० वाजता विमानतळावर अटक करण्यात आली.
विमानतळ प्रशासनाला माहिती
मुंबई मार्गे सौदीला जाणारे जेट एअरवेजचे विमान नागपूर विमानतळाहून ९.४५ वाजता उडणार होते. या विमानाने आरोपी रोशन पळून जाणार असल्याची माहिती ठाणेदार खराबे यांना ९ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. १० मिनिटात विमानतळावर पोहचून आरोपीला ताब्यात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी विमानतळ प्रशासनाला ही माहिती दिली. त्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या माध्यमातून आरोपी रोशनला विमानतळावर ताब्यात घेतले. त्यानंतर तेथे पोहचलेल्या सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. एजंट जॅक पुणे या कंपनीची फ्रेंचायची आरोपी रोशनला मिळणार होती. तो तेथे हॉटेल लावणार होता. मात्र, ऐन वेळी ही फ्रेचायची छाबराने मिळवली. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपींनी त्याचे हॉटेलच जाळून टाकले.

Web Title: The accused arrested the witness and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.