फॅब्रिकेशनचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:51+5:302021-03-23T04:08:51+5:30

नागपूर : कळमन्यातील फॅब्रिकेशनचे दुकान फोडून साहित्य लंपास करणाऱ्या तिघांना कळमना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रफीक मुसानी मोहम्मद हसन ...

Accused of breaking into a fabrication shop is missing | फॅब्रिकेशनचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

फॅब्रिकेशनचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

Next

नागपूर : कळमन्यातील फॅब्रिकेशनचे दुकान फोडून साहित्य लंपास करणाऱ्या तिघांना कळमना पोलिसांनी अटक केली.

मोहम्मद रफीक मुसानी मोहम्मद हसन यांचे कळमण्यात रफिक फॅब्रिकेशन्स नावाचे दुकान आहे. १२ ते २० मार्च दरम्यान हे दुकान बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आतमधील १९ हजाराचे साहित्य चोरून नेले. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संग्राम उर्फ संतोष बबलू पटेल, किसन उर्फ पप्पू देवशरण निर्मलकर, उमेश उर्फ अण्णा सुरेश गुप्ता या तिघांना अटक केली. रविवारी त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले.

---

अल्पवयीन चोरटे गजाआड

नागपूर : कळमण्याच्या गुलमोहर नगरातून श्रीकृष्ण नारायण वानेरे यांचा ऑटो चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. १८ ते १९ मार्चच्या रात्री आरोपींनी वानेरे यांचा ऑटो चोरून नेला होता.

---

Web Title: Accused of breaking into a fabrication shop is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.