फायनान्स कंपनीचा आरोपी संचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:23 AM2020-08-05T00:23:06+5:302020-08-05T00:24:36+5:30

नऊ वर्षांपूर्वी फायनान्स कंपनी उघडून नागपूर, विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी कृष्णा बळीराम पटले याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने आज यश मिळवले.

The accused director of the finance company arrested | फायनान्स कंपनीचा आरोपी संचालक गजाआड

फायनान्स कंपनीचा आरोपी संचालक गजाआड

Next
ठळक मुद्देभंडाऱ्यात केली अटक : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ वर्षांपूर्वी फायनान्स कंपनी उघडून नागपूर, विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी कृष्णा बळीराम पटले याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने आज यश मिळवले.
आरोपी पटले तसेच अभिराम तमंग, संजय चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी हिवरीनगरातील वैष्णवदेवी चौकात धनलक्ष्मी इन्फ्रा ग्रुप ऑफ कंपनीज नावाने कार्यालय थाटले होते. नंतर त्यांनी धनलक्ष्मी इन्फ्रा अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड नावाने रक्कम गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला. कंपनीत रक्कम गुंतविल्यास बँकपेक्षा जास्त व्याज आणि तातडीने अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे आमिष उपरोक्त आरोपी दाखवत होते. त्यासाठी त्यांनी अनेक एजंट नेमले होते. त्यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडून नागपूर विदर्भासह ठिकठिकाणच्या शेकडो गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे आपली आयुष्याची जमापुंजी गुंतवली होती. ३० डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीसाठी यशवंत फत्तुजी राहाटे यांनीही एक लाख रुपये गुंतवले होते. मुदत संपल्यानंतर राहटे आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या व्यक्तींनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले असता आरोपींनी कंपनीचे ऑफिस बंद करून तिथून पळ काढला. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील होते. आरोपी पटले हा तुमसर (जिल्हा भंडारा) येथे लपून असल्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भीमा नरके, उपनिरीक्षक सुरेश वानखेडे, शिरसाट, हवालदार संजय सोनवणे आणि शिपाई ज्वाला मेश्राम यांनी तुमसर येथे जाऊन आरोपी पटेल यांच्या मुसक्या बांधल्या. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याचा ७ ऑगस्ट पर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.

पुढे या, तक्रारी द्या !
या कंपनीत गुंतवणूक करून ज्यांची फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्या, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: The accused director of the finance company arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.