मनोरुग्णालयातून पळाला आरोपी

By Admin | Published: September 4, 2015 02:43 AM2015-09-04T02:43:49+5:302015-09-04T02:43:49+5:30

शासकीय मनोरुग्णालयातून बुधवारी रात्री बलात्काराचा आरोप असलेला एक कैदी शौचालयाची खिडकी तोडून पळून गेला. अखिल अहमद शेख असे फरार आरोपीचे नाव आहे.

The accused escaped from the psychiatric hospital | मनोरुग्णालयातून पळाला आरोपी

मनोरुग्णालयातून पळाला आरोपी

googlenewsNext

नागपूर : शासकीय मनोरुग्णालयातून बुधवारी रात्री बलात्काराचा आरोप असलेला एक कैदी शौचालयाची खिडकी तोडून पळून गेला. अखिल अहमद शेख असे फरार आरोपीचे नाव आहे. तो भंडारा येथील रहिवासी आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी अखिल भंडारा येथील एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी आहे.
मागील दोन वर्षांपासून तो भंडारा कारागृहात बंदिस्त होता. काही दिवसांपासून तो कारागृहात विचित्रपणे वागत होता. विक्षिप्त कृती करणे, बडबड करणे, नको ते चाळे करीत असल्याने त्याला १७ आॅगस्ट रोजी उपचारासाठी नागपुरातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोरुग्णालयातील क्रिमिनल वॉर्ड क्रमांक ११ मध्ये त्याला ठेवण्यात आले होते.
या वॉर्डावर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस शिपाई २४ तास तैनात होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत बुधवारी रात्री आरोपी अखिल शौचालयातून खिडकी तोडून पळून गेला. विशेष म्हणजे, अनेक तास या गंभीर प्रकाराची कुणाला कुणकुणही नव्हती.
आरोपी अखिल वॉर्डात नसल्याचे सकाळी ध्यानात आले. कर्मचाऱ्यांनी शौचालयाची पाहणी केली तेव्हा खिडकीतील सळाखी वाकलेल्या दिसल्या. त्यानंतर तो पळून गेल्याचे उघड झाले.(प्रतिनिधी)
ओडिशात अटक
या घटनेमुळे क्रिमिनल वॉर्डातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे एखादी व्यक्ती पळून जात असेल आणि सुरक्षा रक्षकांना त्याची तासन्तास माहितीच होत नसेल तर हे सुरक्षा रक्षक किंवा येथील सुरक्षा यंत्रणा किती दक्ष आहे, त्याचा प्रत्यय येतो. दरम्यान, रात्री उशिरा अखिलला ओडिशातील संभलपूरमध्ये पोलिसांनी अटक केली.
प्रशासनाला हादरा
या घटनेमुळे मनोरुग्णालय प्रशासनाला मोठा हादरा बसला. त्याचप्रमाणे आरोपी अखिल हा खरेच मनोरुग्ण होता की तो तसे नाटक करीत होता, असा प्रश्न चर्चेला आला आहे. दरम्यान, आरोपी अखिल पळून गेल्याची माहितीवजा तक्रार रुग्णालय प्रशासनाने मानकापूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासासाठी श्वानही सोबत आणले. श्वानाने राजनगर झोपडपट्टीला लागून असलेल्या वॉर्ड नंबर १५-१६ पर्यंत मार्ग दाखवला. नंतर मात्र श्वान घुटमळू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षा भिंतीच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत अखिलचा रुग्णालयातील शर्ट सापडला. त्यामुळे तो येथून उघड्या अंगानेच पळून गेल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

Web Title: The accused escaped from the psychiatric hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.