आरोपीला कारावासाऐवजी १० हजार रुपये दंड

By admin | Published: November 2, 2015 02:16 AM2015-11-02T02:16:34+5:302015-11-02T02:16:34+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीला कारावासाची शिक्षा देणे टाळून १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावला आहे.

The accused has been fined 10 thousand rupees instead of imprisonment | आरोपीला कारावासाऐवजी १० हजार रुपये दंड

आरोपीला कारावासाऐवजी १० हजार रुपये दंड

Next

हायकोर्ट : शस्त्राने गंभीर जखमी करण्याचे प्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आरोपीला कारावासाची शिक्षा देणे टाळून १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावला आहे. १९९४ मध्ये आरोपीने एका व्यक्तीला तलवारीने मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना वाडी येथील आहे.
नागो ऊर्फ शेषराव इस्तारी गवळी (६०) असे आरोपीचे नाव असून तो वाडी येथील रहिवासी आहे. २५ आॅक्टोबर १९९९ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३२४(घातक शस्त्राने जखमी करणे)अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड जमा न केल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने हे प्रकरण फार जुने असल्याने व इतर विविध बाबी लक्षात घेता आरोपीचा दोष कायम ठेवून त्याने आतापर्यंत भोगली तेवढ्याच कारावासाची शिक्षा सुनावली; तसेच १० हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावून ही रक्कम सत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आणि हा दंड जमा न केल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम राहील असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.
सुरुवातीचे काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर आरोपी १९९४ पासून जामिनावर बाहेर आहे. त्याने याचा गैरफायदा घेतला नाही, ही बाब न्यायालयाने निर्वाळा देताना लक्षात घेतली आहे.(प्रतिनिधी)

अशी घडली घटना
फिर्यादीचे नाव सदाशिव राऊत असून सत्र न्यायालयात खटला प्रलंबित असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची चौकशी केलेली नाही. त्याने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली होती. १४ मे १९९४ रोजी आरोपी तलवार हातात घेऊन हंगामा करीत होता. सदाशिव तेथे गेला असता आरोपीने त्याच्यावर हल्ला केला होता.

Web Title: The accused has been fined 10 thousand rupees instead of imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.