चिमुकलीशी चाळे करणा-या आरोपीला जमावाने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:26 AM2018-09-15T01:26:56+5:302018-09-15T01:27:59+5:30

पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या एका आरोपीला संतप्त जमावाने बदडले. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गिट्ठीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हास पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

The accused has to go to the police station to try him | चिमुकलीशी चाळे करणा-या आरोपीला जमावाने बदडले

चिमुकलीशी चाळे करणा-या आरोपीला जमावाने बदडले

Next
ठळक मुद्देशिकवणी वर्गासमोरून घरात नेले : अनर्थ टळला, नागपूरच्या गिट्टीखदान मधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या एका आरोपीला संतप्त जमावाने बदडले. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गिट्ठीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हास पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी पाटील मूळचा अमरावती जिल्ह्यातील तळेगावचा रहिवासी असल्याचे समजते. रेल्वेचा निलंबित कर्मचारी असलेला पाटील सध्या गिट्टीखदानमधील मनीष सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्या खोलीशेजारी शिकवणी वर्ग भरतात. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तेथे एका पालकाने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला सोडले आणि ते घाईगडबडीत निघून गेले. काही वेळेनंतर चिमुकली वर्गाबाहेर आली. आरोपी पाटीलने तिला चॉकलेट आणि आईस्क्रीम देत आपल्या घरात नेले. दार बंद करून तिचे कपडे काढले आणि स्वत:चेही कपडे काढून तो तिच्याशी चाळे करू लागला. घाबरलेली मुलगी जोरात रडू लागल्याने आजूबाजूची मंडळी गोळा झाली. ते लक्षात आल्याने आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीबाहेर आणले. त्याची अवस्था बघून समोरची मंडळी संतापली. त्यांनी रडणाºया मुलीला विचारणा केली असता तिने झालेला प्रकार सांगितला. त्यामुळे शेजारच्यांनी आरोपी पाटीलची बेदम धुलाई केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ देशमुख यांनी गिट्टीखदान ठाण्यात माहिती देऊन पोलिसांना बोलविले. पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नीनेही कानशेकणी केली
आरोपी पाटीलची पत्नी बाहेरगावी खासगी नोकरी करते. त्याला पाच वर्षांचीच मुलगी आहे. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेरून घरी आली. जमावाकडून तिला घडलेला प्रकार कळला. ती रागाने लालबुंद झाली. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत केलेल्या कृत्यामुळे तिने आपल्या नवरोबाला (आरोपीला) दोन कानशिलात लगावल्या. तू तुझे काळे तोंड परत दाखवू नको, असे सुनावत पत्नीने त्याला पोलिसांच्या हवाली करण्याची जमावाला विनंती केली.

Web Title: The accused has to go to the police station to try him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.