मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 22:56 IST2020-10-29T22:54:23+5:302020-10-29T22:56:07+5:30
Murder Case, life imprisonment to accused सत्र न्यायालयाने मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला.

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला. ही घटना २०१७ मधील आहे.
सुनील ऊर्फ ईश्वर रवींद्र जांभुळकर (३०) असे आरोपीचे नाव असून तो श्रावस्तीनगर, इंदोरा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव राजू पांडुरंग ठवरे (५५, रा. बेझनबाग बस स्टॉप) होते. २ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपी सुनील व मयत राजू दोघेही कोराडी मंदिरात गेले होते. दरम्यान, कोराडी पॉवर प्लान्ट सर्व्हिस रोडवरील बोगद्याजवळ आरोपीने राजूच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच, त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत राजू जिवंत होता. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला व आरोपीला अटक केली. त्यानंतर राजूचा मृत्यू झाला.