शेजारी तरुणच निघाला आरोपी

By Admin | Published: July 23, 2016 03:08 AM2016-07-23T03:08:52+5:302016-07-23T03:08:52+5:30

कराटे खेळाडू असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी तिचाच शेजारी निघाला.

The accused left the neighbor | शेजारी तरुणच निघाला आरोपी

शेजारी तरुणच निघाला आरोपी

googlenewsNext

इमामवाडा येथील घटना : मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा शोध लागला
नागपूर : कराटे खेळाडू असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी तिचाच शेजारी निघाला. गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री छडा लावत हे प्रकरण सोडविले. पोलिसांनी आरोपी सोनू गुप्ता (२५) याला ताब्यात घेतले आहे.
रामबाग येथील सोनू अनिल गुप्ता याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा छेडखानीचे दोन गुन्हे दाखल आहेत. २१ जुलै रोजी रात्री १२ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून मेडिकलच्या टी.बी. वॉर्ड परिसरातील बेवारस क्वॉर्टरमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. तेव्हापासून नागरिक संतप्त होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पीडित मुलीकडून आरोपीबाबत मिळालेली माहिती आणि घटनास्थळ पाहता आरोपी परिसरातीलच असल्याचा पोलिसांना संशय होताच. त्यानुसार इमामवाडा परिसरातील संशयितांची धरपकड केली जात होती. शुक्रवारी सकाळी पोलीस रामबाग येथील संशयिताचा बायोडाटा पाहत होते. मुलीने केलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार पोलिसांची सोनूवर नजर गेली. तो महिलांची छेडखानी करण्यासाठी परिसरात ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे सुद्धा दाखल आहेत. तो अचानक गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला पकडले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.
मिळालेल्या माहितीनुसार सोनू पीडित मुलीच्या बहिणीला ओळखत होता. पीडित मुलीची नजर थोडी कमजोर आहे. याबाबत सोनूला माहीत असल्याचा संशय आहे. सोनू ये-जा करीत असलेला रस्ता त्याला माहीत होता. त्याने २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीला मेडिकल चौकात रोखले. तिच्या बहिणीचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच तिची बहीण व तो मुलगा कुठे भेटतात ती जागा तिला दाखवण्याची तयारी दर्शविली. परंतु सोनूसोबत न जाता घरी परत आली. काही वेळानंतर ती करटे क्लासला निघून गेली. तेथून परत येत असतांना सोनुने पुन्हा तिला रोखले.
तसेच ती जागा दाखवण्याच्या बहाण्याने तिला सोबत नेले. तो तिला घेऊन टीबी वॉर्ड परिसरातील बेवारस क्वॉर्टरमध्ये घेऊन गेला. तसेच तिला त्या क्वॉर्टरमध्ये लपून बसण्यास सांगितले. त्यानंतर तो बाहेर आला आणि कुणालातरी फोन केला. नंतर मुलीवर बळजबरी करू लागला. पीडित मुलीने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला लाथ मारून खाली पाडले. दगडही फेकून मारला. यामुळे आरोपीने मुलीला मारहाण केली. तिचे डोकेही फोडले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The accused left the neighbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.