खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती

By admin | Published: February 12, 2017 02:21 AM2017-02-12T02:21:01+5:302017-02-12T02:21:01+5:30

मानकापूर परिसरात मोहित पीटर या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रे आणि शांतिनगर

The accused in the murder case of the police | खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती

खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती

Next

गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी : वसीम चिऱ्या व सोमू शेंद्रेला अटक
नागपूर : मानकापूर परिसरात मोहित पीटर या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रे आणि शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी याचा खुनातील आरोपी कुख्यात शेख वसीम शेख अफजल ऊर्फ चिऱ्या याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी दीड वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागले.
शांतिनगर येथील वसीम ऊर्फ चिऱ्याचा जुना मित्र अनवर चांदीचा परिसरात दबदबा वाढत असल्याने २२ सप्टेंबर २०१५ रोजी अनवरने त्याचा खून केला. दारू पाजण्याच्या बहाण्याने त्याला कारमध्ये बसवून कळमना परिसरात नेले. तिथे त्याला भरपूर दारू पाजून इतर साथीदाराच्या मदतीने त्याच्या गळा कापून खून केला. तेव्हापासून तो फरार होता. शुक्रवारी रात्री आर्णी यवतमाळ येथील कमबल पोश बाबा दरगाह येथे वसीम येणार आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांच्या चमूने त्याला पकडले.
दुसरी घटना २६ जून २०१५ रोजी मानकापूर परिसरात घडली. मार्टीननगर येथील मोहित पीटर हा आपल्या मामाच्या दुकानात नेहमीपमाणे बसला होता. आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रेने साथीदारांच्या मदतीने भरदुपारी मोहितचा खून केला होता. तेव्हापासून तो फरार होता.
आरोपी शुभम हा अजनीतील कौशल्यानगर कुकडे ले-आऊट येथील राहणारा आहे. मृत मोहित हा अजनीतील एका भूखंड माफिया टोळीसाठी काम करीत होता. परंतु काही दिवसांपासून तो या टोळीवर वर्चस्व गाजवू लागला होता. त्यामुळे अजनीतील एक कुख्यात गुन्हेगाराशी संबंधित व्यक्तीला मोहितच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचीही चर्चा होती.
आरोपी शुभम हा कुकडे ले-आऊट येथील घरी गुरुवारी रात्री येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारावर पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड, पीएसआय सचिन लुले, हवालदार बट्टुलाल, प्रकाश वानखेडे यांच्या चमूुने शुक्रवारी सकाळी ५ वाजता शुभमला त्याच्या घरातून अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: The accused in the murder case of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.