जबरी चोरी करणारे आरोपी २४ तासात गजाआड
By दयानंद पाईकराव | Published: April 2, 2023 02:56 PM2023-04-02T14:56:51+5:302023-04-02T14:57:42+5:30
वाठोडा पोलिसांची कामगिरी : दुचाकी थांबवून मारहाण करीत केली होती चोरी
दयानंद पाईकराव, नागपूर : दुचाकीवर स्वार दोघांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम पळविणाºया तीन आरोपींना वाठोडा पोलिसांनी २४ तासात गजाआड केले आहे.
अनुरागप्रसाद रामप्रसाद वर्मा (२६, हिवरीनगर नंदनवन) हे त्यांचा मित्र विनोद इंदर कश्यप (३३) याच्यासोबत आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. ३१, बी. व्ही-१५७३ ने वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चांदमारी मंदिर रोड टी पॉईंट येथून जात होते. तेवढ्यात आरोपी प्रणय उर्फ कालु अशोक पडोळे (१९, धरती मा सोसायटी, वाठोडा), सौजन्य उर्फ बोडर शैलेश गोंडान (१९, मिलननगर, वाठोडा) आणि समशाद उर्फ काली सलामद्दीन राईन (२१, चांदमारी वाठोडा) यांनी संगणमत करून त्यांना थांबविले. आरोपींनी अनुरागप्रसादच्या गाडीची चाबी हिसकावून घेतली.
त्यानंतर त्यास लाकडी दांड्याने डोक्यावर मारून जखमी केले व त्याच्या खिशातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल व त्याच्या मित्राच्या खिशातील ४०० रुपये जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. जखमी अनुरागप्रसादवर उपचार करण्यात आला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात वाठोडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोरेश्वर कारडवार यांनी गांभार्याने तपास केला. अखेर गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेऊन बोलते केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. केवळ २४ तासात आरोपींना गजाआड केल्यामुळे वाठोडा पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"