मर्डरचा आरोपी, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Published: May 19, 2024 05:35 PM2024-05-19T17:35:15+5:302024-05-19T17:36:00+5:30
आरोपी लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा
नागपूर: अल्पवयीन असताना खून केला. गुन्हेगारी जगतात शिरल्यामुळे आरोपी एका पाठोपाठ एक गुन्हे करत गेला. त्याची विकृत मानसिकता कमी झाली नाही. शुक्रवारी १७ मे रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.
राहुल श्रीकृष्ण गायकवाड (२१, रा. बौद्धविहार मागे, गरीब नवाजनगर यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. सध्या तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. तर पिडीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकत असून ती जरीपटका परिसरात राहते. आरोपीची अल्पवयीन मुलीशी मागील १५ दिवसांपूर्वी ओळख झाली. अल्पवयीन असल्यामुळे आरोपीने तिला लग्नाचे आमीष दाखवून फुस लाऊन पळवून नेले. आरोपी तिला जरीपटका परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदिप काईट यांनी आरोपी राहुल विरुद्ध कलम ३६३, ३७६ (२), (एन), ३५४ (ड), सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
अल्पवयीन असताना केला होता खून
आरोपी राहुल लहाणपणापासून गुन्हेगार आहे. अल्पवयीन असताना त्याने मोमिनपुरातील एका युवकाचा खून केला होता. परंतु अल्पवयीन असल्यामुळे तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ अनेक गुन्हे केले. अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविल्यामुळे आरोपी समाजासाठी किती घातक आहे, याची प्रचिती आली आहे.