१२ वर्षांपासून पॅरोलवर फरार असलेला आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:17 PM2019-04-19T23:17:11+5:302019-04-19T23:17:50+5:30

मध्यवर्ती कारागृहातून सात दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आल्यापासून तब्बल १२ वर्षे फरार असलेला आरोपीस जरीपटका पोलिसांनी अटक केली.

The accused on parole escaped for 12 years arrested | १२ वर्षांपासून पॅरोलवर फरार असलेला आरोपी अटकेत

१२ वर्षांपासून पॅरोलवर फरार असलेला आरोपी अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देएनडीपीएसचा आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून सात दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आल्यापासून तब्बल १२ वर्षे फरार असलेला आरोपीस जरीपटका पोलिसांनीअटक केली.
बाळू बाबूलाल अजित (४१) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी बाळू हा जरीपटका येथील कबीरनगरात राहतो. २००७ साली बाळूच्या विरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत प्रकरण सुरु होते. १५ मे २००७ रोजी त्याच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. कारागृह प्रशासनाने त्याला १५ जून रोजी सात दिवसाच्या पॅरोलवर सोडले होते. त्याला २३ जून २००७ पर्यंत तुरुंगात हजर व्हायला हवे होते. परंतु तो कारागृहात परत न येता फरार झाला. त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात कलम २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. परंतु तो कधीही न्यायालयात हजर राहिला नाही. त्याच्याविरुद्ध वॉरंटही बजावण्यात आले होते. यानंतरही त्याचा शोध लागला नाही. उच्च न्यायालयाने बाळूला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर जरीपटका पोलीस बाळूच्या शोधात होते. अखेर बाळूचा पत्ता लागला आणि जरीपटका पोलिसांच्या चमूने त्याला अटक करून न्यायालयासमोर सादर केले.

Web Title: The accused on parole escaped for 12 years arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.