आरोपीला जन्मठेपेऐवजी १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:09 AM2021-09-14T04:09:49+5:302021-09-14T04:09:49+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्ह्यातील खून प्रकरणामध्ये आरोपी लक्ष्मण भीमा मडावी याला जन्मठेपेची शिक्षा रद्द ...

Accused sentenced to 10 years imprisonment instead of life imprisonment | आरोपीला जन्मठेपेऐवजी १० वर्षे कारावास

आरोपीला जन्मठेपेऐवजी १० वर्षे कारावास

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्ह्यातील खून प्रकरणामध्ये आरोपी लक्ष्मण भीमा मडावी याला जन्मठेपेची शिक्षा रद्द करून १० वर्षे सश्रम कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली तर, त्याच्या पत्नी व मुलांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.

५ एप्रिल २०१८ रोजी सत्र न्यायालयाने लक्ष्मणला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची तर, पत्नी शोभा आणि मुले संदीप व प्रदीप यांना ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. मृताचे नाव जगन्नाथ उरकुडे होते. ८ सप्टेंबर २०१० रोजी रोडवर बैल बांधण्याच्या कारणावरून आरोपींनी उरकुडेसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी उरकुडे व त्याचा मुलगा राजू यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना उभारी व काठ्यांनी जबर मारहाण केली होती. आरोपींच्या वतीने ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Accused sentenced to 10 years imprisonment instead of life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.