आरोपीस पाच वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:34+5:302021-09-19T04:09:34+5:30
------------ चार आरोपींना जामीन देण्यास नकार नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राहकांचे पाच कोटी रुपये हडपणाऱ्या चार ...
------------
चार आरोपींना जामीन देण्यास नकार
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राहकांचे पाच कोटी रुपये हडपणाऱ्या चार आरोपींना अग्रीम जामीन देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आरोपींचा अग्रीम जामीन अर्ज फेटाळला आहे. आराेपींमध्ये राजश्री अमरदीप कांबळे, अनिषा अमरदीप कांबळे, वासुदेव हरिश्चंद्र इंगोले व कमलेश दिनकर समर्थ यांचा समावेश आहे. पीडित ग्राहक वर्षा भुरे यांच्या तक्रारीवर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
-------------
उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलला
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निर्णयात आरोपीने राग अनावर झाल्याने मृतकावर हल्ला चढवला होता, असे म्हटले आहे. खून करण्याचा हेतू आरोपीचा नव्हता. त्यामुळे, आरोपी हत्येचा नाही तर सदोष मनुष्यवधाचा आरोपी असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी अकोला जिल्ह्यातील चिखलगाव निवासी गोपाल जानराव सारप आहे. मृतक मुकेश पेंढारकर हा आहे. मुकेशने आरोपीच्या आजारी आईला वाहनात बसवले नव्हते. त्यामुळे, राग अनावर झाल्याने आरोपीने मुकेशवर हल्ला चढवला होता. त्यात मुकेशचा मृत्यू झाला होता. २५ जानेवारी २०१८ला सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबींचा विचार करताना आरोपीस सदोष मनुष्यवधाचा आरोपी ठरवले आहे. त्यामुळे, आतापर्यंत भोगलेला कारावास हीच त्याची शिक्षा असल्याचे स्पष्ट केले. आरोपी २८ डिसेंबर २०१३ पासून तुरुंगात होता. आरोपीकडून अधिवक्ता राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.
...............