वाघाच्या हत्येप्रकरणी आरोपीला १५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:45+5:302021-01-04T04:08:45+5:30
नागपूर : वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांना विषप्रयोग करून ठार केल्याप्रकरणी दिवाकर दत्तूजी नागेकर या आरोपीला १५ जानेवारीपर्यंत न्यायलयीन ...
नागपूर : वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांना विषप्रयोग करून ठार केल्याप्रकरणी दिवाकर दत्तूजी नागेकर या आरोपीला १५ जानेवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात १ जानेवारीला यूपीकेएफ-१ या वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. जवळच अर्धवट खाल्लेली एक गाय आढळली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू दाखल झाली होती. या तपासादरम्यान पुन्हा एक बछडा काही अंतरावर मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी पहिल्याच दिवशी संशयावरून दिवाकर दत्तूजी नागेकर (रा. नवेगाव साधू) याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ च्या कलम ९, २७, २९, ३२, ५१ नुसार गुन्हा दाखल करून २ जानेवारीला उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले होते. प्रारंभिक तपासानंतर त्याला एक दिवसाच्या वनकोठडीत पाठविण्यात आले होते. मात्र याच दिवशी तिसऱ्या बछड्याचे शव सापडल्यावर घटनेला गंभीर वळण मिळाले. या प्रकरणातील तीव्रता लक्षात घेता न्यायालयाने त्याला १५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.