पांढराबोडी हत्याकांडातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:39+5:302021-07-11T04:07:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पांढराबोडीतील कुख्यात गुंड अक्षय बाबूलाल जयपुरे (वय २५, रा. सुदामनगरी) याची हत्या करून फरार ...

Accused of white-collar murder arrested | पांढराबोडी हत्याकांडातील आरोपी जेरबंद

पांढराबोडी हत्याकांडातील आरोपी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पांढराबोडीतील कुख्यात गुंड अक्षय बाबूलाल जयपुरे (वय २५, रा. सुदामनगरी) याची हत्या करून फरार झालेले आरोपी रोशन कैलास सनेश्वर (वय २८) आणि अमर रमेश येरकुडे (वय २६) तसेच त्यांना फरार राहण्यास मदत करणारा आरोपी अमन कैलास सनेश्वर (वय २६) या तिघांच्या मुसक्या बांधण्यात अखेर अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले.

कुख्यात जयपुरेविरुद्ध पोलिसांनी हद्दपारी आणि त्यानंतर एमपीडीएची कारवाई केली होती. सहा महिन्यांपूर्वी तो कारागृहातून परतला आणि पुन्हा भाईगिरी करू लागला. आरोपी सनेश्वर आणि येरकुडेची त्याच्यासोबत मैत्री होती. मात्र, जयपुरेने मंगळवारी रात्री आरोपीच्या एका मित्राला मारहाण केली. त्यामुळे आरोपी संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी जयपुरेला बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंबाझरी बायपास रोडवर चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलवून घेतले. तेथे पोहचताच जयपुरेच्या डोक्यावर सिमेंटचे गट्टू मारून त्याची हत्या केली. बाबुलाल बापुराव जयपुरे (वय ४८) यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी सनेश्वर आणि येरकुडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी रोशनचा भाऊ अमन सनेश्वर हा बेरडी साैंसर (जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथे राहत होता. त्याला फोन करून रोशनने जयपुरेचा गेम केल्याची माहिती दिली. अमनने ही माहिती पोलिसांना न देता आरोपींना आपल्या घरी नेले. तेथे आरोपींपैकी एकाने कटींग दाढी कापली तर दुसऱ्याने टक्कल करून आपले लुक बदलवले.

---

मध्य प्रदेशात पोहचले पोलीस

आरोपी रोशन आणि अमरला फरार राहण्यास अमन सनेश्वर मदत करीत असल्याचे उघड झाल्याने डीसीपी विनिता साहू, एसीपी सुधीर नंदनवार आणि एसीपी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी साैंसरला तपास पथक पाठवले. तेथे अमनला ताब्यात घेतल्यानंतर आरोपी रोशन आणि अमरचा पत्ता पोलिसांना मिळाला. त्यानंतर त्यांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा १५ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.

---

Web Title: Accused of white-collar murder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.