मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक, दोन डझन फोन जप्त
By योगेश पांडे | Published: February 23, 2024 05:58 PM2024-02-23T17:58:11+5:302024-02-23T17:59:18+5:30
पोलिसांनी दोन डझनांहून अधिक मोबाईल फोन जप्त केले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
नागपूर : मोबाईल फोन हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या चौकशीतून एकूण चार गुन्हे उघडकीस आले व पोलिसांनी दोन डझनांहून अधिक मोबाईल फोन जप्त केले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
शितल उईके (२३, साकोली, भंडारा) शिक्षणासाठी नागपुरात वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी रोजी शितलला पुस्तके विकत घ्यायची होती. यासाठी एक मित्र येणार होता. महाराजबाग नर्सरीजवळ प्रतिक्षा करत असताना मागून पांढऱ्या मोपेडवर आलेल्या दोन आरोपींनी फोन हिसकावून पळ काढला. शितलच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून रुपेश महेश यादव (१९, तुलसीनगर, भांडेवाडी) व करण राजू पगारे (१८, तुलसीनगर, भांडेवाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी फोन चोरल्याची कबुली दिली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मोबाईल चोरीचे दोन व हुडकेश्वरमध्ये एक गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.