डॉक्टरची बुलेट चोरणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

By योगेश पांडे | Published: March 8, 2024 04:44 PM2024-03-08T16:44:04+5:302024-03-08T16:44:18+5:30

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

Accused who stole doctor's bullet arrested due to CCTV | डॉक्टरची बुलेट चोरणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

डॉक्टरची बुलेट चोरणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

नागपूर : मेडिकल इस्पितळ परिसरातून एका डॉक्टरची बुलेट चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

२८ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मेडिकल बॉईज हॉस्टेलमध्ये राहणारे डॉ.अमनप्रितसिंग राजेंद्रसिंग (२८) यांची १.६९ लाखांची बुलेट चोरी गेली. त्यांनी एम.एस.कार्यालयाच्या पार्किंग शेडमध्ये बुलेट उभी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने आशिष भरत निहारे (२५, केळझर, सेलू, वर्धा), अंकीत अशोक चौकरी (२२, वालदुर, हिंगणघाट, वर्धा) व राजेश रमेश झोटींग (२१, भानसोली, हिंगणा) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून बुलेट, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिनही आरोपींना अजनी पोलीस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Accused who stole doctor's bullet arrested due to CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.