१३ प्रतिष्ठानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:07 AM2021-04-27T04:07:47+5:302021-04-27T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी सोमवारी उदयनगर चौक येथील लक्की चिकन शॉप ...

Action on 13 establishments | १३ प्रतिष्ठानांवर कारवाई

१३ प्रतिष्ठानांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी सोमवारी उदयनगर चौक येथील लक्की चिकन शॉप व ताजबाग येथील रजा किराणा स्टोअर्स सील केले.

१६ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून १ लाख २५ हजाराचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ५७ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, हनुमाननगरमध्ये दोन प्रतिष्ठानाची तपासणी करून ५ हजार, धंतोली झोनमध्ये नऊ प्रतिष्ठानांची तपासणी करून ७ हजार रुपये दंड केला. नेहरूनगरच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनमध्ये सहा ठिकाणी तपासणी करून ४० हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, आसीनगरमध्ये १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, लकडगंज झोनमध्ये सात प्रतिष्ठानांची तपासणी करून ८ हजार तर मंगळवारी झोनमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.

.....

Web Title: Action on 13 establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.