१९ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.४० लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:21+5:302021-05-10T04:08:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ४० हजारांचा दंड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ४० हजारांचा दंड वसूल केला. पायोनिअर नर्सिंग होमने बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याने १० हजारांचा दंड केला. पथकाने ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
लक्ष्मीनगर विभागांतर्गत तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, हनुमान नगर विभागाच्या पथकाने १० हजार, धंतोलीच्या पथकाने १५ हजारांचा दंड वसूल केला. नेहरू नगर येथे ९ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये, गांधीबाग येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार दंड वसूल केला. लकडगंज पथकाने १० हजार रुपये, आसीनगर पथकाने १५ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार तर मंगळवारी झोन पथकाने १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.