११ प्रतिष्ठानांवर कारवाई, ९० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:46+5:302021-04-26T04:07:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी रविवारी ११ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई ...

Action against 11 establishments, fine of Rs 90 lakh | ११ प्रतिष्ठानांवर कारवाई, ९० लाखांचा दंड

११ प्रतिष्ठानांवर कारवाई, ९० लाखांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी रविवारी ११ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून ९० हजारांचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ६७ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. हनुमाननगरमध्ये एका प्रतिष्ठानाची तपासणी करून ५ हजार, धंतोली झोनमध्ये १० प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड केला. नेहरूनगरच्या पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, गांधीबाग झोनमध्ये पाच ठिकाणी तपासणी करून ५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, आसीनगरमध्ये १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, लकडगंज झोनमध्ये १९ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार तर मंगळवारी झोनमध्ये आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 11 establishments, fine of Rs 90 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.