मास्क न वापरणाऱ्या १५४ जणांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:09 AM2021-02-09T04:09:12+5:302021-02-09T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १५४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १५४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ७७ हजार रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३०,८९५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ३८ लाख ६ हजर ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
सोमवारी पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २, धरमपेठ १५, हनुमाननगर ४३, धंतोली ११, नेहरूनगर ६, गांधीबाग १४, सतरंजीपुरा ४, लकडगंज २४, आशीनगर १३, मंगळवारी २० आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत २५,४२५ नागरिकांकडून १ कोटी २७ लाख १२ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे. नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे.