२३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.९३ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:48+5:302021-05-05T04:10:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी २३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन १ लाख ...

Action against 23 establishments; 1.93 lakh fine | २३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.९३ लाखाचा दंड

२३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.९३ लाखाचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी २३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन १ लाख ९३ हजारांचा दंड वसूल केला. बहरामजी टाऊन येथील फिटनेस सायक्लोन जीमला मंगळवारी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. यावेळी पथकानी ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर विभागांतर्गत दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत ५ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. हनुमान नगर विभागाच्या पथकाने एका प्रतिष्ठानाची तपासणी केली. धंतोलीच्या पथकाने १० हजारांचा दंड वसूल केला. नेहरु नगर येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये, गांधीबाग येथे सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून ६० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, लकडगंज येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून २३ हजार रुपये, आसीनगर पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये तर मंगळवारी विभागामधील चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action against 23 establishments; 1.93 lakh fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.