नागपुरात  २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:29 AM2019-10-18T00:29:24+5:302019-10-18T00:30:11+5:30

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Action against 23 medical professionals in Nagpur | नागपुरात  २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

नागपुरात  २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देबायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकला : २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णालयात निर्माण होणारा बायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यामध्ये टाकल्या जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या मंगळवारी सीताबर्डी येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाने बायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकल्याने त्यांच्याकडून धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाने २५ हजार रुपये दंड वसूल केला. स्वच्छता निरीक्षक जयंत जाधव, उपद्रव शोध पथकाचे धरमपेठ झोन टीम लीडर आशिष कटरे यांच्यासह झोनच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्क्वॉड लीडर वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले नागपूर स्वच्छ, सुंदर राहावे तसेच येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी मनपातर्फे कारवाई केली जात आहे. मात्र अनेकदा नियमांचे उल्लंघन करून स्वच्छ नागपूरच्या संकल्पनेला अडसर निर्माण केला जात आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे झोनस्तरावर उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करून अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम उपद्रव शोध पथकाद्वारे सुरू आहे.

लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक सात जणांवर कारवाई
बायोमेडिकल कचऱ्याबाबत उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये एकूण २३ प्रकरणात कारवाई करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये ७ व्यावसायिकांवर, धंतोली झोनमध्ये ६, मंगळवारी झोनमध्ये ५, तर धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गांधीबाग व आसीनगर झोनमध्ये अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.

Web Title: Action against 23 medical professionals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.