रेल्वेतील ३ हजारांवर फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडूका; RPF ची कारवाई, राज्यभरात २४ हजारांवर गुन्हे दाखल

By नरेश डोंगरे | Published: December 25, 2023 06:42 PM2023-12-25T18:42:45+5:302023-12-25T18:44:03+5:30

आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत.

Action against 3,000 hawkers in railways Action of RPF, cases filed against 24 thousand across the state | रेल्वेतील ३ हजारांवर फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडूका; RPF ची कारवाई, राज्यभरात २४ हजारांवर गुन्हे दाखल

रेल्वेतील ३ हजारांवर फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडूका; RPF ची कारवाई, राज्यभरात २४ हजारांवर गुन्हे दाखल

नागपूर : मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा दंडूका चालविला आहे. नागपूर विभागात गेल्या आठ महिन्यात तब्बल ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आकडा २४,३३९ एवढा आहे. रेल्वेगाडीत चढून आरडाओरड करीत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडीत त्यांचा सकाळपासून रात्रीपर्यंत धुमाकूळ सुरू असतो.

त्यांच्या आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत. प्रवाशांच्या सारख्या वाढत्या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांना आवरण्याची जबाबदारी आरपीएफवर सोपविली. त्यानुसार, आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाचही विभागात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत आरपीएफने नागपूर विभागात फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. तब्बल ३१८१ गुन्हे दाखल करून ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील फेरीवाल्यांवर कारवाईचा आकडा मोठा आहे. पाच विभागात एकूण २४,३३९ गुन्हे दाखल करून आरपीएफने २४,३३४ फेरीवाल्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३.५ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला.
 
कारवाईची विभागनिहाय माहिती

  • मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद, ९३९३ जणांना अटक आणि १.०२ कोटी रुपये दंड वसूल 
  • भुसावळ विभागात ७२०६ गुन्हे दाखल, ७२०५ लोकांना अटक आणि १.२९ कोटींचा दंड वसूल
  • पुणे विभागाच्या आरपीएफने १९९० गुन्हे दाखल करून १९९१ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून १३.८८ लाख दंड वसूल
  • आरपीएफ सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल करून २५६६ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून २५.८७ लाख रुपये दंड वसूल
     

Web Title: Action against 3,000 hawkers in railways Action of RPF, cases filed against 24 thousand across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.