३०४ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:14+5:302021-03-18T04:09:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर पाेलीस आयुक्तालयांतर्गत आठवडाभराचा लाॅकडाऊन लागू केला आहे. कामठी ...

Action against 304 drivers | ३०४ वाहनचालकांवर कारवाई

३०४ वाहनचालकांवर कारवाई

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर पाेलीस आयुक्तालयांतर्गत आठवडाभराचा लाॅकडाऊन लागू केला आहे. कामठी शहर व ग्रामीण भागात लाॅकडाऊनची याेग्य अंमलबजावणी करण्यासाठी पाेलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, लाॅकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ७९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कामठी शहरात लाॅकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद हाेती. वर्दळीच्या चाैकात बुधवारी शुकशुकाट दिसून आला. शहरातील कळमना मार्ग, जयस्तंभ चाैक, अजनी रेल्वे फाटक तसेच रनाळा भागात पाेलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. याठिकाणी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जुनी व नवीन कामठी पाेलिसांनी नाकाबंदीदरम्यान ३०४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, बुधवारी अतिरिक्त पाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार रणजित दुसावार, ठाणेदारद्वय सतीश मेंढे, विजय मालचे यांनी नाकाबंदी पाॅईंट व शहरात पाहणी केली. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांना केले.

Web Title: Action against 304 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.